esakal | मित्रांबाबत कसं बोलावं हेही ट्रम्प यांना कळत नाही; बायडेन संतापले
sakal

बोलून बातमी शोधा

joe biden

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.

मित्रांबाबत कसं बोलावं हेही ट्रम्प यांना कळत नाही; बायडेन संतापले

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी एकमेकावंर आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडलेली नाही. ट्रम्प यांनी भारतासंबंधी एक टिपण्णी केली होती. ज्यो बायडेन यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ट्रम्प यांना मित्रांशी कसे बोलायचं हे देखील माहिती नाही, असं ते म्हणाले आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यामध्ये 23 ऑक्टोबर रोजी दुसरी प्रेसिडेंशियल डिबेट पार पडली. यावेळी पॅरिस करारातून माघार घेण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले होते की, ''भारताची हवा घाणेरडी आहे. हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत अमेरिका खूप पुढे आहे.'' ट्रम्प यांच्या वक्तव्यावर ज्यो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला घाण म्हटले. आपल्या दोस्तांशी कसे बोलावे याची जाण त्यांना नाही. शिवाय जागतिक पर्यावरणाच्या आव्हानाशी कसे लढावे याचीही त्यांना माहिती नाही, असं बायडेन म्हणाले आहेत. 

corona virus update;रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर; रुग्णांची संख्या घटली 

उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या उल्लेख करत बायडेन पुढे म्हणाले की, ''मी आणि हॅरिस दोन्ही देशांच्या भागिदारीला महत्व देतो. आम्ही आपल्या विदेश नितीमधील सन्मान पुन्हा मिळवू.'' ज्यो बायडेन यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियातूनही प्रतिक्रिया उमटत होत्या. नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली होती. ट्रम्प आणि मोदी चांगले मित्र आहेत, पण ट्रम्प भारताबद्दल वाईट का बोलत आहेत, असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला होता. ट्विटरवर हाऊडी मोदी हा हॅशटॅग काही काळासाठी ट्रेंडमध्ये आला होता. दुसरीकडे काहींनी ट्रम्प यांचे वक्तव्य योग्य असल्याचे म्हटले होते. दिल्लीमधील हवेची गुणवत्ता आणि वॉशिंग्टमधील हवेची गुणवत्ता याचा दाखल काहींनी यासाठी दिला होता.

दरम्यान, अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका 3 नोव्हेंबर रोजी होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा राष्ट्रपती होण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत, पण ज्यो बायडेन त्यांना चुरशीची टक्कर देताना दिसत आहेत. दोन्ही नेत्यांनी भारतीय-अमेरिकी नागरिकांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.