भारतासाठी गूड न्यूज! अमेरिकेची रशियन तेल खरेदीच्या परवानगीला मुदतवाढ, पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रणात राहणार

America on Russian Oil ट्रम्प प्रशासनाकडून १७ एप्रिलला नवा परवाना जारी करण्यात आलाय. यानुसार आता १६ मे २०२६ पर्यंत रशियन तेलाची खरेदी करता येणार आहे. भारतासह अनेक देशांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
Iran Sets Ten Conditions for Ceasefire

donald trump

Esakal

Updated on

अमेरिकेनं रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांवर लावलेल्या निर्बंधात सूट आणखी एक महिन्यासाठी वाढवली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून १७ एप्रिलला नवा परवाना जारी करण्यात आलाय. यानुसार आता देशात १६ मे २०२६ पर्यंत रशियन तेलाची खरेदी करता येणार आहे. भारतासह अनेक देशांना यामुळे दिलासा मिळाला आहे. अमेरिकेच्या निर्णयामुळे स्वस्तात कच्चे रशियन तेल मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी सूट आणखी वाढवली जाणार नाही असं विधान दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर अचानक युटर्न घेत महिन्याभरासाठी मुदतवाढ देण्यात आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com