

Fear of Trump's 'ICE' raids; 30,000 Indian farm workers quit jobs in US!
Sakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने राबवलेल्या कठोर इमिग्रेशन कारवाईचा मोठा फटका आता अमेरिकेतील शेती व्यवसायाला बसू लागला आहे. इमिग्रेशन एजन्सी 'आयसीई' (ICE) च्या छाप्यांच्या भीतीमुळे अमेरिकेतील विशेषतः कॅलिफोर्निया परिसरातील सुमारे ३० हजार भारतीय शेतमजुरांनी शेतातील काम सोडले आहे. या मजुरांच्या टंचाईमुळे फळं आणि भाज्यांचे उत्पादन व पुरवठा विस्कळीत होऊन अमेरिकेत शेतमालाचे दर कडाडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.