US Financial Scam : अमेरिकेत मोठा आर्थिक घोटाळा! भारतीय वंशाच्या ‘CEO’वर तब्बल ४००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

CEO Bankim Brahmbhatt accused in US financial fraud : जाणून घ्या, बंकिम ब्रह्मभट्ट हे कोण आहेत आणि त्यांच्यावर नेमका काय आहे आरोप?
US Financial Scam : अमेरिकेत मोठा आर्थिक घोटाळा! भारतीय वंशाच्या ‘CEO’वर तब्बल ४००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
Updated on

Bankim Brahmbhatt: Who is the Indian-Origin CEO Accused in US Financial Scam? : अमेरिकेतील भारतीय वंशाचे टेलीकॉम कंपनीचे सीईओ बंकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर तब्बल ५०० दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास चार हजार कोटी रुपयांवरून अधिकच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे. तर  वॉल स्ट्रीट जर्नल (डब्ल्यूएसजे) नुसार, ब्रह्मभट्ट यांनी बनावट ग्राहक खाती आणि महसूल दस्तऐवज तयार करून अमेरिकन बँकांकडून मोठी कर्जे मिळवली आहेत.

या घोटाळ्यात आघाडीची गुंतवणूक कंपनी HPS इन्व्हेस्टमेंट पार्टनर्स आणि जागतिक पातळीवरील असेट मॅनेजमेंट दिग्गज ‘ब्लॅकरॉक’ यांच्या फंडचाही समावेश आहे. रिपोर्टनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये कर्जदारांनी असा दावा दाखल केला की ब्रह्मभट्ट यांनी कर्ज हमी म्हणून अस्तित्वात नसलेले महसूल स्रोत कर्जाची हमी म्हणून गहाण ठेवले होते. 

HPS ने सप्टेंबर २०२० मध्ये ब्रह्मभट्ट यांच्या एका कंपनीला कर्ज देण्यास सुरुवात केली आणि २०२१ च्या सुरुवातीला ही रक्कम हळूहळू वाढून ३८५ दशलक्ष आणि ऑगस्ट २०२४ पर्यंत तब्बल ४३० दशलक्ष पर्यंत वाढली. या कर्जातील जवळजवळ निम्मा हिश्श्यास BNP Paribas बँकेकडून वित्तपुरवठा केला गेला होता.

US Financial Scam : अमेरिकेत मोठा आर्थिक घोटाळा! भारतीय वंशाच्या ‘CEO’वर तब्बल ४००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
LPG Price Cut : ‘एलपीजी’च्या किमती कमी झाल्या! , आजपासून गॅस सिलिंडरचे दर बदलले

त्यांच्या कंपन्यांनी आता Chapter 11 दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज दाखल केला आहे, जो कंपन्यांना अमेरिकन कायद्यानुसार पुनर्रचना करण्याची परवानगी देतो. त्याच दिवशी ब्रह्मभट्ट यांनी वैयक्तिक दिवाळखोरीसाठी अर्जही दाखल केला होता. तसेच ब्रह्मभट्ट यांच्या वकिलांनी सर्व आरोप निराधार असल्याचे फेटाळून लावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com