भारत,अमेरिकेतील संरक्षण सहकार्य सर्वोच्च पातळीवर

पीटीआय
रविवार, 4 डिसेंबर 2016

भारत व अमेरिकेमधील संरक्षण क्षेत्रामधील सहकार्य हे इतके विकसित याआधी कधीही नव्हते. आमच्या व्यूहात्मक भागीदारीमधून अमेरिकेस पश्‍चिमेमधील समतोल साधण्यात यश येईल; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या "ऍक्‍ट ईस्ट' धोरणामधून पूर्वेकडे भारताचा प्रभाव वाढविण्यात यश येईल...

वॉशिंग्टन - भारत व अमेरिकेमधील संरक्षणविषयक सहकार्य हे सध्या सर्वोच्च पातळीवर असल्याचे मत अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऍश्‍टन कार्टर यांनी व्यक्त केले आहे.

"भारत व अमेरिकेमधील संरक्षण क्षेत्रामधील सहकार्य हे इतके विकसित याआधी कधीही नव्हते. आमच्या व्यूहात्मक भागीदारीमधून अमेरिकेस पश्‍चिमेमधील समतोल साधण्यात यश येईल; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या "ऍक्‍ट ईस्ट' धोरणामधून पूर्वेकडे भारताचा प्रभाव वाढविण्यात यश येईल. जमीन, सागर आणि हवाई अशा तीनही क्षेत्रामध्ये भारत व अमेरिकेचे संरक्षण सहकार्य सध्या ऐन भरात आहे. याशिवाय तंत्रज्ञानाच्या पातळीवरही द्विपक्षीय सहकार्य वाढते आहे. भारत-अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापारविषयक मोहिम व भारतीय पंतप्रधानांच्या "मेक इन इंडिया' मोहिमेच्या एकत्रीकरणामधून दोन्ही देशांना अधिकाधिक प्रगत शस्त्रास्त्र व्यवस्थांचा विकास व निर्मिती संयुक्तरित्या करता येणे शक्‍य झाले आहे,'' असे कार्टर म्हणाले.

कॅलिफोर्नियामधील सिमी व्हॅली येथील रिगन राष्ट्रीय संरक्षण संस्थेस (फोरम) संबोधित करताना कार्टर बोलत होते. कार्टर हे पुढील आठवड्यात भारतास भेट देणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर, त्यांनी व्यक्त केलेली ही भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Web Title: US-India Defence Cooperation like never before