कोरोनाचा प्रसार नेमका कुठून झाला? अमेरिकेची गुप्तचर संस्था म्हणतेय...

corona updates
corona updatese sakal
Updated on

वाशिंगटन : कोरोनाचा प्रसार (Corona Spread) हा लॅबमधून झाला की प्राण्यांमधून मानवामध्ये आला यावर अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनी (US Intelligence Agency) अभ्यास केला. मात्र, त्यांना अपयश आले असून हा विषाणू नेमका कुठून आला हे सांगणे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाची नैसर्गिक उत्पत्ती किंवा लॅबमधून लिक होणे ही दोन्ही गृहीतकडे असून याबाबत कुठलाही निष्कर्ष थेट काढू शकत नाही, असं यूएस डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सने म्हटलं आहे.

corona updates
लस घेतली-नाही घेतली तरी कोरोना होण्याचा धोका सारखाच; 'लँसेट'चा दावा

कोरोनाचे विषाणू हे लॅबमध्ये तयार करण्यात आल्याच्या दाव्याला या संशोधनातून फेटाळून लावले आहे. या दाव्याचं समर्थन करणाऱ्यांना वुहानच्या प्रयोगशाळेत थेट प्रवेश नाही. तसेच त्यांच्यावर चुकीची माहिती पसरविल्याचा आरोप आहे, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा कोविड -१९ चा “चायना व्हायरस” म्हणून उल्लेख केला होता. काही अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी या विषाणूची उत्पत्ती निसर्गात झाली या स्पष्टीकरणाचे जोरदार समर्थन केले होते. या अहवालावरून चीनने देखील नाराजी व्यक्त केली आहे. कोविड-19 ची उत्पत्ती शोधण्यासाठी शास्त्रज्ञांऐवजी आपल्या गुप्तचर यंत्रणेवर अवलंबून राहण्याच्या अमेरिकेच्या हालचाली हा संपूर्ण राजकीय कट आहे, असे अमेरिकेतील चीनचे दूतावास लिऊ पेंग्यू म्हणाले.

अमेरिकेच्या काही गुप्तचर संस्थांनी करोना विषाणूची उत्पत्ती निसर्गात झाल्याचे जोरदार समर्थन केले. ओडीएनआयच्या अहवालात चार गुप्तचर संस्था आणि एका संस्थेला काहीशी खात्री आहे की कोरोना विषाणूची उत्पत्ती संक्रमित प्राणी किंवा संबंधित विषाणूपासून झाली आहे. पण, त्याची उत्पत्ती नेमकी कुठून झाली हे सांगता येणार नाही, असे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com