लस घेतली-नाही घेतली तरी कोरोना होण्याचा धोका सारखाच; 'लँसेट'चा दावा

corona  patient
corona patient sakal media
Updated on

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यामध्ये लसीकरण हेच मोठे हत्यार आहे. मात्र, लसीकरणानंतर देखील कोरोना नियमांचे पालन हे अनिवार्यच असून त्यातून कोणत्याही प्रकारची सूट दिली जात नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन हे लस घेतलेली असो अथवा नसो, बंधनकारकच आहे. मात्र, प्रश्न असा आहे की, लसीकरणाने संपूर्ण सुरक्षा मिळते की नाही? या संदर्भातच आता एक महत्त्वपूर्ण रिपोर्ट 'द लँसेट'मध्ये प्रकाशित झाला आहे. या रिपोर्टनुसार, हे खरंय की, लसीकरणामुळे कोरोनाच्या लढ्यात व्यक्तीला मदत होते मात्र, लसीमुळे संपूर्ण सुरक्षा प्रदान होतेच, असं नाहीये. जवळपास एका वर्षाच्या संशोधनानंतर ही बाब समोर आलीय की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यामध्ये देखील कोरोना संक्रमित होण्याचे चान्सेस 38 टक्के आहेत. मात्र, फरक इतकाच की, त्यांच्यावर दवाखान्यात भरती व्हायची वेळ येत नाही.

corona  patient
2024 नंतर मोदींची गच्छंती फिक्स; लालूंना 100 टक्के विश्वास

वेळेनुसार लसीचा प्रभाव होतो कमी

'द लँसेट'मध्ये पुढे म्हटलंय की, वेळेनुसार, लसीचा प्रभाव देखील घटताना दिसून येतो. यासाठी फायझर आणि एस्ट्राझेनेकावर अभ्यास केला गेला. या संशोधनात असं आढळून आलंय की, एका महिन्यापर्यंत 88 टक्के आणि एस्ट्राझेनेकाचा 77 टक्के प्रभाव राहतो. मात्र, पाच महिन्यानंतर हा प्रभाव क्रमश: 74 टक्के आणि 67 टक्क्यापर्यंत कमी होतो.

कोरोना व्हायरसचे म्यूटेशन धोक्याची घंटा

हे संशोधन सप्टेंबर 2020 पासून सप्टेंबर 2021 च्या दरम्यान करण्यात आलं आहे. यामध्ये एकूण 440 कुटुंबीयांवर संशोधन करण्यात आलं. यामध्ये आढळलं की, ज्या लोकांनी कोरोनाचे लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी संक्रमणाचा धोका कमी होता. मात्र, ते पूर्णपणे सुरक्षित होतेच, असं नाही. तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की, यामुळे हे ध्यानात येतंय की, कोरोना व्हायरस स्वत:ला म्युटेट करतो आहे आणि त्यामुळेच या संक्रमणातून पूर्णपणे मुक्ती मिळत नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com