Crude Oil Prices Rise
esakal
मध्यपूर्वेतील अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने मंगळवारी इराणच्या केशम बेटावर हवाई हल्ले केल्याची माहिती आहे. या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतली आहे. आशियाई बाजारात ब्रेंट क्रूड आणि अमेरिकन डब्ल्यूटीआय (WTI) या दोन्ही प्रकारच्या तेलाच्या दरात ०.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.