US Iran Peace Talks : अमेरिका-इराणची २१ तासांची शांती चर्चा निष्फळ; होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम

Iran US relations : दोन्ही देशांमध्ये मतभेद कायम असले तरी संवाद सुरू ठेवण्याचे संकेत देण्यात आले. अमेरिकन आणि इराणी शिष्टमंडळांनी शस्त्रसंधी वाढवण्यावर मुख्यतः चर्चा केली.मतभेद कायम असून पाकिस्तानने संयुक्त गस्तीचा प्रस्ताव दिला आहे.
US Iran Peace Talks : अमेरिका-इराणची  २१ तासांची शांती चर्चा निष्फळ; होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम
Updated on

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण मधील २१ तास सुरु असलेली शांती चर्चा निष्फळ ठरली आहे. दोन्ही बाजूंमध्ये कोणताही करार होऊ शकला नाही. ही चर्चा कोणत्याही निष्कर्षाविना संपुष्टात आल्या संपली रविवारी इस्लामाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी सांगितले की, विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असली, तरी या वाटाघाटी कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. कोणताही करार न करता आपण अमेरिकेला परत जात असल्याचे त्यांनी जाहीर केले.पण यापूर्वीच व्हाईट हाऊस आणि इराण या दोघांनीही असे संकेत दिले होते की, काही मतभेद असूनही, दोन्ही देशांमधील संवाद मात्र सुरूच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com