US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

US Iran war : अमेरिका आणि इस्रायल-इराण युद्धाला १८ दिवस झाले असून मध्यपूर्वेत तणाव कायम आहे.इराणचे सुरक्षा प्रमुख इस्रायली हल्ल्यात ठार झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. या हल्ल्यात लारीजानी यांचा मुलगा आणि अंगरक्षकांचाही मृत्यू झाला.
US military airstrikes target Iranian missile bases near the Strait of Hormuz amid escalating conflict with Israel, intensifying regional instability.

US military airstrikes target Iranian missile bases near the Strait of Hormuz amid escalating conflict with Israel, intensifying regional instability.

esakal

Updated on

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला आता अठरा दिवस उलटले आहेत आज बुधवार, १८ मार्चपर्यंतची ही स्थिती आहे. तरीही शांततेची कोणतीही आशा अद्याप दिसत नाही. मध्य पूर्व सध्या युद्धाच्या आगीत होरपळून निघत आहे. इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारीजानी हे इस्रायली हल्ल्यात मारले गेल्याच्या वृत्ताला इराण सरकारने दुजोरा दिला आहे. दरम्यान अमेरिकन लष्कराने 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'जवळ असलेल्या इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ले चढवले असून, त्यासाठी त्यांनी त्यांच्या सर्वात शक्तिशाली बॉम्बचा वापर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com