ब्रिटनच्या प्रिन्स अँड्र्यूंच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने खटला फेटाळला lPrince Andrew | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prince Andrew

प्रिन्स अँड्र्यूंच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने खटला फेटाळला

व्हर्जिनिया गिफ्रेने (Virginia Giffre) दाखल केलेल्या बलात्काराचा खटला रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला. यामुळे ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू (Prince Andrew) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गिफ्रेने दाखल केलेला खटला फेटाळू शकत नाही.अँड्र्यूला त्याचा सामना करावा लागेल. असे न्यूयॉर्कच्या (New York Court) फेडरल कोर्टातील न्यायाधीशांनी सांगितले.

हेही वाचा: होनोलुलुतील पर्ल हार्बर संग्रहालय

एका इंग्रजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य आणि यॉर्कचे ड्यूक प्रिन्स अँड्र्यू यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती लुईस कॅप्लान म्हणाले, जिफ्रे १७ वर्षांची असताना राजकुमारने तिच्यावर बलात्कार केला असा आरोप तिने केला आहे. व्हर्जिनिया गिफ्रेच्या तक्रारीत काहीही संदिग्धता नाही. दाखल केलेला हा खटला फेटाळता येणार नाही.

हेही वाचा: नवऱ्यासाठी नव्हे तर... वजनदार पत्नी स्लिम झाली; अन्...

प्रिन्स अँड्र्यूवर काय आहेत आरोप

गिफ्रेने तक्रारीत म्हटले आहे की, अँड्र्यूने 2001 मध्ये फायनान्सर जेफ्री एपस्टाईनच्या (Jeffrey Epstein)मदतीने शोषण केले होते. त्यावेळी मी अल्पवयीन असल्याचे राजकुमारला माहीत होते. प्रिन्सने व्हर्जिन आयलंडमधील एका खाजगी बेटावर, मॅनहॅटनमधील त्याच्या हवेलीत आणि लंडनमधील एका माजी मैत्रिणीच्या घरी माझ्यावर बलात्कार केला .

खटला फेटाळण्याची कोर्टाला केली विनंती

लैंगिक शोषणासाठी महिलांची तस्करी केल्याचा आरोप असलेल्या ६६ वर्षीय एपस्टाईनने २०१९ मध्ये आत्महत्या केली होती. हे सर्व आरोप चुकीचे आहेत असे प्रिन्स अँड्र्यूने सांगितेल होते. शिवाय हा खटला फेटाळण्याची विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, ज्या महिलेने आरोप केले आहेत त्या महिलेचा खटला फेटाळला जाऊ शकतो, कारण ती आता अमेरिकेत राहत नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top