

Why Trump Faces a Midterm Setback
esakal
US Midterm Elections 2026: Key Results and Updates : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मध्यावधी निवडणूक प्रतिष्ठेची ठरण्याची शक्यता आहे. मंगळवारी सुरू झालेली मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष निवडणूक निकालांकडे लागले आहे. नॉर्थ कॅरोलिना, ओहायो आणि जॉर्जियासारख्या महत्त्वाच्या राज्यांतील मतदान संपल्यानंतर सुरुवातीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. या निकालांमुळे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षासमोरील आव्हाने वाढल्याचे चित्र आहे. महागाई, वाढता राहणीमानाचा खर्च आणि इराणशी संबंधित संघर्षाच्या मुद्द्यांवरून अमेरिकन मतदारांमध्ये नाराजी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा