अमेरिकेचा संयम संपुष्टात : टिलरसन

पीटीआय
शुक्रवार, 17 मार्च 2017

टिलरसन यांनी उत्तर कोरियाच्या युद्धखोर वृत्तीचा तीव्र निषेध केला. या देशाने सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी घेत तणाव वाढविणे सुरूच ठेवल्यास, लष्करी कारवाईचाही पर्याय अमेरिकेसमोर खुला असल्याचे टिलरसन यांनी स्पष्ट केले

सोल - अण्वस्त्रक्षम उत्तर कोरियाबाबत असलेला अमेरिकेचा "धोरणात्मक संयम' संपुष्टात आला असून, अमेरिकेला आता "पुढील कारवाई' करणे भाग आहे, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन यांनी आज (शुक्रवार) दिला.

दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असलेले टिलरसन यांनी उत्तर कोरियाच्या युद्धखोर वृत्तीचा तीव्र निषेध केला. या देशाने सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी घेत तणाव वाढविणे सुरूच ठेवल्यास, लष्करी कारवाईचाही पर्याय अमेरिकेसमोर खुला असल्याचे टिलरसन यांनी स्पष्ट केले. उत्तर कोरियाला शह देण्यासाठी दक्षिण कोरियाला अधिकाधिक मदत करून त्यांच्याशी संबंध दृढ करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असून, टिलरसन यांचा दौरा हा त्याचाच एक भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: US policy of 'strategic patience' with North Korea over: Tillerson