
Donald Trump Speech In UNGA
ESakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (२३ सप्टेंबर २०२५) संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) भाषण करताना युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी भारत आणि चीन रशियाला निधी देत असल्याचा आरोप केला. ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे. ज्यामुळे भारतावरील एकूण अमेरिकन कर ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. जो जगातील सर्वाधिक आहे.