esakal | USA Election : कोरोनाच्या संकटातही ट्रम्प यांना प्रचारसभेची घाई; ट्रम्प काय म्हणाले पाहा!
sakal

बोलून बातमी शोधा

USA_Donald_Trump

गेल्या दोन आठवड्यांपासून अमेरिकेत वर्णभेदाविरोधी निदर्शनं सुरु आहेत. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूचा निषेधार्थ लाखोंचा जनसागर रस्त्यावर उसळला आहे.

USA Election : कोरोनाच्या संकटातही ट्रम्प यांना प्रचारसभेची घाई; ट्रम्प काय म्हणाले पाहा!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूचा अमेरिकेत उद्रेक झाला आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 14 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून 20 लाखांपेक्षा अधिक नागरिक कोरोनाग्रस्त आहेत. आणि अजूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे.

कोरोनामुळे भयंकर परिस्थिती उद्भवली असताना या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांनी प्रचारसभा घेण्याचे संकेत दिले आहेत. 'मी प्रचारसभा घ्यावी यासाठी मोठी मागणी होत आहे. त्यामुळेच लवकरच आम्ही प्रचार मोहिम सुरु करणार आहोत. कदाचित मी पुढच्या आठवड्याच प्रचारसभा घेईन,' असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे. त्यामुळे कोरोनाने देशात थैमान घातले असताना ट्रम्प प्रचारसभा घेण्याच्या मुडमध्ये आहेत.

नोंव्हेबरच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यावेळी ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडेन यांनी आव्हान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प पुन्हा एकदा प्रचार मोहिम सुरु करणार आहेत. मात्र, देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ट्रम्प यांचा निर्णय धाडसी मानला जात आहे. 

- ...अन् चीनच्या लढाऊ विमानांवर आली पळ काढण्याची वेळ

आफ्रिकन-अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलिस कारवाईत मृत्यू झाला होता. त्यामुळे अमेरिकेत जनक्षोभ उसळला असून अनेक नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. 'ब्लॅक लाईव्हज मॅटर' हे जनआंदोलन जोर धरु लागलं आहे. या आंदोलनाचा दाखला देत एका आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या पत्रकारने आंदोलनाचे फोटो शेअर केले होते. तसेच कोरोनाच्या काळात असे मोठ्या प्रमाणात लोक जमा होणे ठिक आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांनी प्रसारसभा घेणे सुरु करावे, असं उपहासात्मक ट्विट त्याने केलं होतं. ट्रम्प यांनी ही पोस्ट रिट्विट केली आहे. तसेच पुढील आठवड्यात प्रचारसभा घेण्याचे संकेत दिले आहेत.

G-7 शिखर परिषदेत 'हा' देश चीनविरोधात उठवणार आवाज; का? वाचा सविस्तर!

गेल्या दोन आठवड्यांपासून अमेरिकेत वर्णभेदाविरोधी निदर्शनं सुरु आहेत. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूचा निषेधार्थ लाखोंचा जनसागर रस्त्यावर उसळला आहे. काही आंदोलकांकडून सामाजिक अंतराचे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. तसेच अनेकांनी हिसेंचा मार्ग वापरला आहे. हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येत असल्याने कोविड -19 चा प्रसार रोखणे सरकारसमोर मोठं आव्हान ठरले आहे. अशातच ट्रम्प यांनीही प्रचारसभा घेण्याचे संकेत दिल्याने कोरोनाबाधितांची संख्या हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

- जॉर्जला अखेरचा निरोप; आईच्या थडग्यापाशीच दफन केला मृतदेह

डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलकांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. आंदोलनादरम्यान हिंसा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं ते म्हणाले आहेत. तसेच गरज पडल्यास अमेरिकी लष्कर आंदोलकांविरोधात वापरण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

loading image