Video : 'बाहुबली' ट्रम्प यांनाही आवरला नाही व्हिडिओ शेअर करण्याचा मोह!

वृत्तसंस्था
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

पत्नी मेलानिया राहणार हजर

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येत आहे. त्यानंतर भारत दौऱ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ रिट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प बाहुबलीच्या अवतारात दिसून येत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सोमवारी (ता.24)  भारत दौऱ्यावर येत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू आहे. या दौऱ्यासाठी स्वतः ट्रम्पही बरेच उत्सुक आहेत. ट्रम्प यांनी पहाटे चारच्या सुमारास हा व्हिडिओ रिट्विट केला. त्यानंतर अडीच तासांत सुमारे 13 हजार यूजर्सनी याला रिट्विट केले असून, 50 हजार जणांनी लाईक केले.

अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प 11 किमीचा रोड शो करणार आहेत. हा रोड शो खास करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. रोड शोसाठी रस्त्यामध्ये 28 स्वागत मंच तयार केले आहेत. 

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक; सेनेगलमधून ठोकल्या बेड्या

पत्नी मेलानिया राहणार हजर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका ट्रम्प येणार आहेत. इवांका ट्रम्प यांचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US President Donald Trump Shared Bahubali Video