esakal | चीन तालिबानला पैसा पुरवेल, याची भीती वाटते का? बायडेन म्हणाले....
sakal

बोलून बातमी शोधा

america joe biden

चीन तालिबानला पैसा पुरवेल, याची भीती वाटते का? बायडेन म्हणाले....

sakal_logo
By
दीनानाथ परब

वॉशिंग्टन: अफगाणिस्तानात (afganistan) तालिबानने काळजीवाहू सरकार (taliban govt) स्थापन केल्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (jo biden) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तालिबानला सध्या चीनच समर्थन प्राप्त आहे. त्या मुद्यावर भाष्य करताना बायडेन यांनी 'तालिबानसोबत जुळवून घेण्य़ासासाठी चीन (china) काहीतरी मार्ग काढेल याची मला खात्री आहे' असं म्हटलं आहे.

चीन तालिबानला पैसा पुरवेल, याची तुम्हाला भीती वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर बायडेन म्हणाले की, "चीनची तालिबान बरोबर समस्या आहे. पण त्यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी चीन प्रयत्न करेल, याची मला खात्री आहे" अमेरिका आणि त्यांचे सात सहकारी देश परस्परांमध्ये समन्वय साधून तालिबानचा विषय हाताळणार आहेत.

हेही वाचा: अफागाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी, मोहंमद अखुंदबद्दलच्या पाच गोष्टी

अमेरिकेने त्यांच्या बँकांमध्ये असलेला अफगाणिस्तानाचा पैसा रोखून धरला आहे. जेणेकरुन तो सहजतेने तालिबानच्या हातात पडणार नाही. महिलांना त्यांचे हक्क देणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे सांगितल्याप्रमाणे तालिबानच्या राजवटीत पालन होते का? ते तपासण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा: 1 नोव्हेंबरपासून 'या' स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्‌सअ‍ॅप होणार बंद

चीन, रशिया आणि अन्य देशांनी तालिबानला पैसा पुरवला, तर अमेरिकेने केलेल्या आर्थिक कोंडींचा फायदा होणार नाही, असे तज्ज्ञ सांगतात. सध्या इटलीकडे जी २० चे अध्यक्षपद आहे. मोठ्या अर्थव्यवस्था असलेले देश या गटामध्ये आहेत. रशिया आणि चीन सुद्धा जी २० चा हिस्सा आहे. लवकरच हा गट अफगाणिस्तानसंबंधी व्हर्च्युअल बैठक आयोजित करणार आहे.

loading image
go to top