esakal | 1 नोव्हेंबरपासून 'या' फोन्समध्ये व्हॉट्‌सअ‍ॅप होणार बंद; पाहा संपूर्ण यादी
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

1 नोव्हेंबरपासून 'या' स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्‌सअ‍ॅप होणार बंद

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

WhatsApp हे सध्याच्या काळात आपल्या सर्वांसाठी अत्यंत गरजेचे झाले आहे. बऱ्याच जणांची अनेक कामे याच्या खेरीस होत नाहीत. मात्र जर तुम्ही तुमचा जुन्या डिव्हाइसवर WhatsApp वापरत असाल तर तो फोन आता तुम्हाला अपडेट करावा लागणार आहे. व्हॉट्‌सअ‍ॅपने अलीकडेच मिनीमम सिस्टम रिक्वायरमेंट्स अपडेट केल्या आहेत आणि त्यामुळे व्हॉट्‌सअ‍ॅप काही डिव्हाइसवरती चालणे बंद होईल. व्हॉट्‌सअ‍ॅपने त्यांच्या पेजवर आपल्या रिक्वायरमेंट्स अपडेट केल्या आहेत ज्यामध्ये सांगण्यात आले की 1 नोव्हेंबर 2021 पासून अँड्रॉइड 4.0.3 आईस्क्रीम सँडविच, आयओएस 9 आणि kaiOS 2.5.0 साठी सपोर्ट करणे बंद करेल. व्हॉट्‌सअ‍ॅपने यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये जुन्या डिव्हाइसना सपोर्ट करणे बंद केले होते.

अँड्रॉइड आणि आयओएसच्या या OSसाठी सपोर्ट होणार बंद

व्हॉट्‌सअ‍ॅपने आपल्या FAQ पेजवर म्हटले आहे की, Android वर चालणारे OS 4.1 आणि नवीन iOS 10, नवीन आयफोन, जिओफोन आणि जिओफोन 2 यासह kaiOS 2.5.1 स्मार्टफोनला देखील सपोर्ट करेल. जर तुमच्याकडे यापैकी एखादा डिव्हाइस असल्यास, WhatsApp इंस्टॉल करा आणि आपला फोन नंबर रडिस्टर करा. एका वेळी एका डिव्हाइसवर फक्त एका फोन नंबरवरुन व्हॉट्‌सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्ह केले जाऊ शकते असे व्हॉट्‌सअ‍ॅपने म्हटले आहे. त्यामुळे जर तुमचा फोन अँड्रॉईड 4.0.3 आइस क्रीम सँडविच, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 वर चालत असेल, तर तुम्ही तुमच्या डिव्हाइसचे सॉफ्टवेअर अपडेट करा किंवा तुमचा डिव्हाइस बदला.

1 नोव्हेंबरनंतर होणार व्हॉट्‌सअ‍ॅप सपोर्ट बंद

जर तुम्ही 1 नोव्हेंबरपूर्वी तुमचा फोन अपग्रेड केला नाही तर व्हॉट्‌सअ‍ॅप तुमच्या फोनवर काम करणे थांबवेल आणि तुम्ही अ‍ॅपवर मेसेज पाठवू किंवा मिळवू शकणार नाहीत. जर तुम्हा या काळात नवीन फोन विकत घेऊ शकत नसाल तर तुम्ही आपला फोन अंतिम मुदतीपूर्वी आपला फोन अपडेट करुन घ्या. त्यामुळे तुमच्या फोनवर हे अ‍ॅप काम करणे थांबवण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या चॅटचे Google ड्राइव्हवर बॅकअप घेऊ शकाल. जर तुम्ही तुमच्या फोनवरून व्हॉट्‌सअ‍ॅप अनइंस्टॉल तुमची चॅट सुरक्षित ठेवायची असेल, तर अनइंस्टॉल करण्यापूर्वी तुमच्या चॅटचा बॅकअप घ्या.

हेही वाचा: 15 सप्टेंबरला लॉंच होणार Dizo Watch 2 आणि Dizo Watch Pro

ही आहे स्मार्टफोन्सची यादी

1 नोव्हेंबरपासून 40 हून अधिक मोबाईल फोन आहेत ज्यावर व्हॉट्‌सअ‍ॅप काम करणे बंद करेल. असे फोन्स Apple iOS आणि Android या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आहेत. द सनच्या मते, अँड्रॉइड 4.0.4 आणि त्यापेक्षा जुने व्हेरियंट असलेल्या स्मार्टफोनवर व्हॉट्‌सअ‍ॅपला सपोर्ट मिळणे बंद होईल. जेव्हा Apple बद्दल सांगायचे झाल्यास iOS 9 वर चालणारे iPhones बूट होतील.

Sony Xperia

Huawei Ascend Mate आणि Ascend D2

Apple iPhone SE, 6S, आणि 6S Plus

Samsung Galaxy S3 Mini, Trend II, Trend Lite, Core, Ace 2

LG Optimus F7, F5, L3 II Dual, F7 II, F5 II

Alcatel One Touch Evo 7, Archos 53 Platinum, HTC Desire 500, Caterpillar Cat B15, Wiko Cink Five, Wiko Darknight, Lenovo A820, UMi X2, Faea F1, आणि THL W8

हेही वाचा: महिंद्रा स्कॉर्पियो घ्यायचीय? मग हे आहे सर्वात स्वस्त मॉडेल

loading image
go to top