2021 च्या नोबल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांचे नामांकन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे 2021 च्या नोबल शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे 2021 च्या नोबल शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलं आहे. इस्राईल आणि युएई यांच्यातील शांतता करारासाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल ट्रम्प यांचे नामांकन झाले आहे. त्यांच्या नावाची नॉर्वेचे उजव्या विचारसरणीचे दक्षिणपंथी खासदार Tybring-Gjedde यांनी शिफारस केली आहे. नार्वेमध्ये अँटि इमिग्रेशन म्हणजेच प्रवासी विरोधी भूमिकेसाठी हे खासदार ओळखले जातात. राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांनीही अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नागरिकांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळं अनेकदा वाद निर्माण झाला आहे. 

Tybring-Gjedde यांनी सांगितलं की, ट्रम्प हे या पुरस्काराच्या तीन अटींमध्ये बसतात. एक- जगातील देशांमध्ये सहकार्य वाढवणं जे त्यांनी बऱ्याचदा केलं आहे. दोन सैन्य कमी करणं, त्यांनी मिडल इस्टमध्ये अमेरिकन सैन्याची संख्या कमी केली. तीन - पीस काँग्रेसला प्रोत्साहन देण. ट्रम्प यांनी शांतता करारात मोठं योगदान दिलं आहे. 

हे वाचा - "कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होणे अपमानाची गोष्ट असेल"

एका मुलाखतीत Tybring-Gjedde यांनी सांगितलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इतर नामांकन करण्यात आलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त योगदान दिलं आहे. त्यांनी ट्रम्प यांची सिफारस करताना जे नामांकन पत्र नोबल समितीला पाठवलं आहे त्यामद्ये लिहंल आहे की, ट्रम्प प्रशासनाने इस्राईल आणि य़ुएई यांच्यात शांतता करार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. तसंच मिडल इस्टमध्ये इतर देशदेखील यामध्ये पुढे पाऊल टाकतील अशी आशा आहे. ज्यामुळे मिडल इस्ट सहकार्य आणि समृद्धीच्या दिशेनं पुढे जाईल. 

Tybring-Gjedde म्हणाले की, मी काही ट्रम्प समर्थक नाही पण ट्रम्प यांनी अनेक संघर्ष करणाऱ्या देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावली आहे. त्यांनी भारत पाकिस्तान यांच्यातील काश्मीर मुद्दा, उत्तर-दक्षिण कोरियातील वादात मध्यस्थीसाठीही पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US President Trump nominated for 2021 Nobel Peace Prize for brokering UAE Israel peace deal