अमेरिकेचा निकाल आपल्या नजरेतून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या म्हणजेच अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूकीची चर्चा साधारणपणे वर्षापासून सुरू होती. या निवडणूकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अमेरिकेचे अध्यक्ष कोण होणार, याबाबत अनेकांनी अंदाजही व्यक्त केले होते.

बहुचर्चित अशा अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांचा पराभव करुन ऐतिहासिक व धक्कादायक विजयाची नोंद केली. अन् आतापर्यंतच्या अध्यक्षांपेक्षा सर्वाधिक वय असलेले ट्रम्प नवे अध्यक्ष झाले.

अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ट्रम्प यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा असतील. अथवा, विविध देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधाबाबत त्यांचे निर्णयही महत्वपूर्ण ठरतील. किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावरही काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांच्या निवडीबाबत आपल्याला काय वाटते अथवा आपल्या अपेक्षा काय आहेत. याबाबत webeditor@esakal.com वर जरूर लिहा. subject मध्ये usa result लिहा.

Web Title: us presidential election analysis