

चीनमधून नव्याने पसरत असलेल्या एचएमपीव्ही व्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे. त्यातच आता अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे पहिल्या मानवी मृत्यूची नोंद झालीय. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं वय ६५ वर्षे इतकं होतं. त्याला अनेक गंभीर आजार होते. गेल्या काही दिवसांपासून श्वसनाशी संबंधित आजारांमुळे वृद्धावर रुग्णालयात उपचार केले जात होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.