

US Senate Passes 100% Tariff Bill Targeting Russia Oil Buyers
esakal
अमेरिकेच्या सिनेटने रशियाकडून पेट्रोलियम उत्पादने खरेदी करणाऱ्या देशांवर मोठे शुल्क लावण्यासंदर्भातील विधेयक मंजूर केले आहे. या प्रस्तावानुसार, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या जगातील पाच प्रमुख देशांवर अमेरिकेकडून १०० टक्क्यांपर्यंत शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या यादीत भारतासह चीन आणि अन्य तीन देशांचा समावेश आहे. सिनेटमधील मंजुरीनंतर आता हे विधेयक प्रतिनिधीगृहात मांडले जाणार आहे.