
America Faces Shutdown as Funding Bill Fails
Esakal
अमेरिका पुन्हा एकदा सरकारी शटडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला सीनेटमध्ये तात्पुरत्या निधीसाठीचं विधेयक मंजूर करण्यासाठी किमान ६० मतांची गरज होती. पण ट्रम्प फक्त ५५ मतेच मिळवू शकले. यामुळे त्यांचं विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. आता यामुळे सरकारकडे आवश्यक निधी कुठून आणायचा यासाठी पर्याय नाही. परिणामी अनेक सरकारी कामांना ब्रेक लागू शकतो. अमेरिकन कायद्यांअतर्गत जोपर्यंत अर्थसंकल्प किंवा तात्पुरत्या निधीचं विधेयक मंजूर होत नाही तोपर्यंत आपत्कालीन नसलेल्या काही सरकारी विभाग आणि सेवा बंद कराव्या लागतात. या परिस्थितीला शटडाऊन म्हटलं जातं. गेल्या दोन दशकात अमेरिकेत पाचव्यांदा मोठ्या शटडाऊनची स्थिती निर्माण झालीय.