
US Shutdown Explained Republicans Attack Democrats Over Debt
Esakal
अमेरिकेत पुन्हा एकदा शटडाऊन करण्यात आलंय. यामुळे अमेरिकेतलं राजकीय वातावरणही तापलं असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रिपब्लिकन नेत्यांनी डेमोक्रेट्सवर आऱोप केलाय की बेकायदेशीर प्रवाशांना मोफत सेवा देण्याच्या अटीवर अर्थसंकल्प मंजूर होण्यापासून ते रोखत आहेत. तर डेमोक्रेट्सनी म्हटलंय की, रिपब्लिकन गरजेच्या खर्चांना राजकीय वादविवादाचा मुद्दा बनवत आहेत. दरम्यान, शटडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्हाइट हाउसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी पत्रकार परिषद घेत यावर माहिती दिलीय. पत्रकार परिषदेतही दोघांनी डेमोक्रेट्सच्या नेत्यांवर निशाणा साधला.