

Donald Trump tariff
ESakal
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला. सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी इतर देशांवर लादलेले कर बेकायदेशीर घोषित केले. आपल्या निर्णयात न्यायालयाने म्हटले आहे की, ट्रम्प यांनी इतक्या देशांवर कर लादून आपल्या अधिकारक्षेत्राचा वापर केला आहे. ट्रम्प यांनी राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी तयार केलेल्या कायद्याअंतर्गत कर लादले आहेत.