

US President Donald Trump
esakal
भारत आणि अमेरिका यांच्या एका अंतरिम व्यापार कराराची रूपरेषा निश्चित झाल्याची घोषणेनंतरही डोनाल्ड ट्रम्प प्रशासन पुन्हा एकदा "टॅरिफ बॉम्ब"टाकण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकन प्रशासनाने भारतसह १२ प्रमुख व्यापारी भागीदार देशांतून आयात होणाऱ्या उत्पादनांवर १०% किंवा त्याहून अधिक अतिरिक्त शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयाचे समर्थन करताना, अमेरिकेने असा आरोप केला आहे की, या देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या काही वस्तू कदाचित 'सक्तीच्या श्रमाचा' (forced labor) वापर करून उत्पादित केल्या गेल्या असाव्यात.