esakal | अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक, 1 कोटीपेंक्षा जास्त रुग्ण असलेला पहिलाच देश
sakal

बोलून बातमी शोधा

USA Covid 19 third wave

जगातील एकूण कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 5 कोटींच्या पुढे गेली आहे.

अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक, 1 कोटीपेंक्षा जास्त रुग्ण असलेला पहिलाच देश

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा कहर काही देशांत वाढतानाच दिसत आहे. युरोपातही कोरोनाची दुसरी लाट आल्याने ब्रिटन, फ्रांन्स, जर्मनी आणि बेल्जियमसारख्या देशांनी लॉकडाउनही जाहीर केलं आहे. आता दुसरीकडे अमेरिका जगातील पहिला असा देश बनला आहे, जिथं आतापर्यंत 1 कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे संपूर्ण अमेरिकेत कोरोनाची तिसरी लाट आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ-
तसेच जगातील एकूण कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 5 कोटींच्या पुढे गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील 10 दिवसांत अमेरिकेत कोरोनाच्या 10 लाख रुग्णांचं निदान झालं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, शनिवारी अमेरिकेत 1 लाख 31 हजार 420 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तसेच मागील 7 दिवसांत 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळण्याची ही चौथी वेळ आहे.

US Election: आईच्या आठवणीने गहिवरल्या कमला हॅरिस

रुग्णवाढीच्या सरासरीत वाढ-
तसेच मागील 7 दिवसातील प्रतिदिन नवीन कोरोना रुग्णांची सरासरी तब्बल 1 लाख 5 हजार 600 आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाने 2 लाख 37 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये आढळला होता.

मृत्यूदरात वाढ-
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील मागील 5-6 आढवड्यांत मृत्यूदरातही वाढ झाल्याचेही दिसले आहे. अमेरिकेत मागील 7 दिवसांत 1 कोटी 5 लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यातील 6.22 टक्के लोकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

'मी लोकांना तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी काम करणार'

धोक्याचा इशारा-
विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कारकिर्द 20 जानेवारीपर्यंत आहे. तोपर्यंतच्या जवळपास 85 दिवसांमध्ये, सरकारने कठोर पावले उचलली नाहीत आणि आवश्‍यक उपाययोजना केल्या नाहीत तर, 1 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, असा इशारा ग्लोबल हेल्थ संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. रॉबर्ट मर्फी यांनी दिला आहे. गेल्या दोन आठवड्यात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(edited by- pramod sarawle)

loading image