अमेरिकेने पाकिस्तानची मदत रोखली

donald trump
donald trump

वॉशिंग्टन: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकिस्तानवर आर्थिक संकट आणखीच गडद होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणाऱ्या 1,66 अब्ज डॉलरची (सुमारे 12 हजार कोटी रुपये) मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल रॉब मॅनिंग यांनी मंगळवारी मेलवरून पाठविलेल्या प्रश्‍नांस उत्तर देताना म्हटले, की पाकिस्तानला देण्यात येणारी 1,66 अब्ज डॉलरची संरक्षणविषयक मदत थांबवण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान कारवाई करत नसल्याने केवळ ट्रम्प प्रशासनच नाही तर अमेरिकी नागरिकही नाराज असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने म्हटले आहे. या निर्णयाच्या अगोदर आयएमएफनेदेखील पाकिस्तानला दणका दिला आहे. मदतनिधीसाठी आयएमएफने काही अटी घातल्या आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी मदतनिधीची गरज आहे. आयएमएफने पाकिस्तानकडून चीनबरोबरच्या आर्थिक सहकार्य कराराचा तपशील मागितला आहे. त्याचवेळी पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश या कराराचा खुलासा करण्याबाबत टाळाटाळ करत आहेत. दरम्यान. ट्रम्प यांनी रविवारी केलेल्या ट्‌विटमध्ये पाकिस्तानकडून दहशतवाद रोखण्यासंदर्भात समाधानकारक पावले उचलत नसल्यामुळे लाखो डॉलरची सैनिक मदत निधी करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनच्या मुद्‌द्‌यावरूनही ट्रम्प यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. अमेरिकेने पाकिस्तानला अब्जावधी डॉलरची मदत दिली, मात्र त्याने लादेनचा ठावठिकाणा सांगितला नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. यावर्षी सप्टेंबरमध्येदेखील अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी 2100 कोटी रुपयाची मदत रोखली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com