अमेरिकी सरकारी कामकाज सोमवारीही "शटडाउन'च

पीटीआय
मंगळवार, 23 जानेवारी 2018

ट्रम्प सरकारच्या वर्षपूर्तीच्या दिवशीच (शनिवारी) सरकारी खर्चाबाबतचे विधेयक मंजूर होऊ न शकल्यामुळे अमेरिकेतील सरकारी कामकाज बंद ठेवण्याची नामुष्की आली होती. सोमवारीही सरकारी कामकाज ठप्पच राहिले

वॉशिंग्टन - कामकाजाच्या नव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही (सोमवारी) शटडाउनमुळे अमेरिकेतील सरकारी कामकाज बंद होते. अमेरिकेच्या संसद सदस्यांना चर्चेनंतरही तोडगा काढण्यात अपयश आल्यामुळे शटडाउनचा कालावधी वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

शटडाउनच्या संकटातून मार्ग काढण्यात अमेरिकेच्या संसद सदस्यांना शनिवार आणि रविवारच्या चर्चेनंतरही यश आले नाही. मात्र, चर्चेदरम्यान प्रगती झाली असल्याचे दोन्ही बाजूंकडून मान्य करण्यात आले. या प्रकरणी होणारी मतविभागणी आणखी अकरा तासांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. मतदान स्थानिक वेळेनुसार सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारीही शटडाउनमुळे अमेरिकेतील सरकारी कामकाज बंद होते.

ट्रम्प सरकारच्या वर्षपूर्तीच्या दिवशीच (शनिवारी) सरकारी खर्चाबाबतचे विधेयक मंजूर होऊ न शकल्यामुळे अमेरिकेतील सरकारी कामकाज बंद ठेवण्याची नामुष्की आली होती. सोमवारीही सरकारी कामकाज ठप्पच राहिले.
 

Web Title: usa donald trump