US Student Visa Rules : भारतीय विद्यार्थ्यांना मोठा धक्का ! अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करणे कठीण, सरकार आकारणार ८० लाखांचे शुल्क

International Students USA : भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊ शकतात कारण ते कर्ज घेऊन शिक्षण घेतात. प्रस्ताव मंजूर झाल्यास विद्यार्थी किंवा नियोक्ता शुल्क भरणार का, हे अद्याप स्पष्ट नाही.
International students in the USA

International students in the USA

esakal

Updated on

कर्ज काढून अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या आणि तिथेच काम करू इच्छिणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर नवीन आर्थिक बोजा टाकण्याची तयारी सुरू आहे. अहवालांनुसार, पदवी पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत राहून काम करू इच्छिणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला सरकारला १,००,००० डॉलर्सचे (सुमारे ८० लाख रुपये) मोठे शुल्क भरावे लागू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. शिक्षणासाठी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अमेरिकेत जात असल्याने, हे पाऊल त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com