Flood America : अमेरिकेत भीषण पूर! 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू, नदीची पातळी अचानक 26 फूट वाढली; लहान मुलंही बेपत्ता
Texas Flood Death Toll, River Water Level Surge : टेक्सास राज्यातील केर काउंटीमध्ये (Kerr County) अचानक आलेल्या पूरामुळे भीषण हाहाकार माजला असून, आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
वॉशिंग्टन :अमेरिका सध्या दोन मोठ्या कारणांमुळं चर्चेत आहे. एक म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावरील नोबेल पारितोषिक आणि टॅरिफबाबतचं वक्तव्य, तर दुसरं कारण म्हणजे टेक्सासमध्ये आलेला प्रचंड पूर (Texas Flood).