esakal | बायडेन यांचा मोठा निर्णय; ट्रम्प यांच्या आदेशाला केराची टोपली
sakal

बोलून बातमी शोधा

बायडेन यांचा मोठा निर्णय; ट्रम्प यांच्या आदेशाला केराची टोपली

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. बाय़डेन यांनी आता नवा आदेश दिला आहे.

बायडेन यांचा मोठा निर्णय; ट्रम्प यांच्या आदेशाला केराची टोपली

sakal_logo
By
सूरज यादव

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुरुवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत टिकटॉक, वीचॅट आणि इतर 8 अॅप्सवरील बंदी हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. बाय़डेन यांनी आता नवा आदेश दिला आहे. त्यानुसार आता या अॅप्सची चौकशी केली जाईल. तसंच हेसुद्धा पाहण्यात येईल की, या मोबाइल अॅप्समुळेअमेरिकेच्या सुरक्षेला खतरा आहे की नाही.

ज्यो बायडेन यांनी सांगितलं की, आमचे सरकार लोकांना ऑनलाइन सुरक्षा प्रदान करणार आहे. आम्ही ग्लोबल डिजिटल इकॉनॉमीचं समर्थन करतो. अशा परिस्थिती आम्ही निर्णय मागे घेतला आहे. आता नव्याने या सर्व गोष्टी पाहण्यात येतील.

हेही वाचा: पॅलेस्टाइननंतर सीरियामध्ये इस्रायलचा मोठा AIR STRIKE

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर जगभरात चीनवर टीकेचा भडीमार केला जात होता. त्याचवेळी चिनी वस्तू, अॅप्स यावर अनेक देशांनी बंदी घातली. चिनी अॅप्सच्या माध्यमातून डाटा चोरीच्या घटनाही समोर आल्या होत्या. तेव्हा ट्रम्प यांनी टिकटॉक, वीचॅटसह काही अॅप्सवर बंदीचा इशारा दिला होता.

ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात अमेरिकन कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून टिकटॉक आणि वीचॅटसारखी अॅप्स डाउनलोड करण्यावर बंदी घालण्यात आली. ज्यांनी आधीच अॅप्स डाउनोड केले होते त्यांना वापर करता येणार होते.

हेही वाचा: 83 टक्के अमेरिकन भारतीय हिंदू स्वत:ला सांगतात उच्च जातीचे- सर्व्हे

भारतानेसुद्धा गेल्या वर्षी अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यामध्ये टिकटॉक, वीचॅट यासह जवळपास 100 अॅप्सचा समावेश होता. यामुळे देशाची सुरक्षितता आणि सार्वभैमत्वाला धोका असल्याचं कारण सांगण्यात आलं होतं.