क्रिकेट खेळणार्‍या मुलानी मारला शॉट तर कुत्र्याने उडी मारून पकडला जबरदस्त कॅच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

संपूर्ण भारतभर आयपीएल (IPL 2020) ची क्रेझ सुरु आहे. त्यातच सध्या आयपीएलचा फीवर कुत्र्यांमध्येसुद्धा चढला आहे. सोशल मीडियावर एक माणूस आणि कुत्राचा एक व्हिडिओ  व्हायरल होत आहे.

पुणे : नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच सध्या आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. तो म्हणजे एका ठिकाणी एका मुलाने क्रिकेट खेळत असताना शॉट (षटकार) मारला तर त्यावेळी कुत्र्याने हवेत मोठी उडी मारून कॅच पकडला आहे.

संपूर्ण भारतभर आयपीएल (IPL 2020) ची क्रेझ सुरु आहे. त्यातच सध्या आयपीएलचा फीवर कुत्र्यांमध्येसुद्धा चढला आहे. सोशल मीडियावर एक माणूस आणि कुत्राचा एक व्हिडिओ  व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्हाला ही नक्कीच हसू येईल. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गल्लीमध्ये क्रिकेट खेळत असताना एका व्यक्तीने षटकार (शॉट) मारला तर कुत्र्याने हवेत उडून बॉल कॅच पकडला आहे.

 

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ 'बिलकुल एलिमेंट्री' नावाच्या अकाउंटने शेयर केला आहे. ज्यांना फनी डॉग व्हिडिओ शेयर करण्यासाठी ओळखले जाते. क्रिकेट खेळताना हवेत बॉल पाहून कुत्रा उडी मारतो आणि तोंडात पकडतो. कंमेंट्समध्ये कुत्र्याने कॅच पकडल्यामुळे त्याचे कौतुक देखील केले गेले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

'बिलकुल एलिमेंट्री' ने व्हिडिओ शेयर करत कैप्शनमध्ये लिहिले आहे की, 'इस आईपीएल आप कौन रंग चुनेंगे?' 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ 20 सप्टेंबरला शेयर केला आहे. ज्याने आतापर्यंत 10 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. तसेच, लाखाहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. 

एक यूजर ने लिहिले आहे की, 'व्वा सुपर कॅच, पाहण्यात मजा आली.' त्याचवेळी दुसर्‍या यूजरने लिहिले, 'जरा विचार करा, भारतीय टीममध्ये कुत्रा फील्डिंग करत असला असता तर किती मजा आली असती.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A video of a dog playing cricket is going viral on social media