बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मानलं भारतासह भूतानचं आभार

Abdul AK Momen
Abdul AK Momenesakal
Summary

बांगलादेशच्या स्वातंत्र्याला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.

बांगलादेशच्या (Bangladesh) स्वातंत्र्याला आज 50 वर्षे पूर्ण झाली. भारतात हा दिवस विजय दिन (Vijay Diwas 2021) म्हणून साजरा केला जातो. १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताच्या (India) सशस्त्र दलानं पूर्व पाकिस्तानला (Pakistan) संघर्षातून मुक्त करून नवा बांगलादेश निर्माण केला होता. त्याआधी १० दिवसांपूर्वी भारत आणि भूताननं बांगलादेशला स्वंतत्र देश म्हणून मान्यता दिली होती. ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल एके मोमेन (Abdul AK Momen) यांनी भारत आणि भूतानचे आभार मानले आहेत.

मोमेन यांनी बांगलादेशच्या राष्ट्रीय प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात म्हटलं की, भारताच्या मान्यतेनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) युद्धविरामासाठी मतदान घेण्यात आलं होतं. भूतानचेसुद्धा (Bhutan) आम्ही त्यावेळी आमच्यासोबत उभा राहण्यासाठी आभार मानतो. बांगलादेशला भारत आणि भूताननं ६ डिसेंबर १९७१ रोजी मान्यता दिली होती. यानंतरच संयुक्त राष्ट्रात भारताला रशियाचं समर्थन मिळवता आलं होतं. मात्र, यात भारताच्या आधी भूताननं बांगलादेशला अधिकृत मान्यता दिली होती. त्यासाठी बांगलादेश सदैव भूतानचे आभार मानतो.

Abdul AK Momen
तबलिगी जमातीवरील Video भोवला; तमिळनाडूचा YouTuber मारिदासला अटक

बांगलादेशला सर्वात आधी मान्यता दिली यावरून अनेकदा चर्चा होते. २०१४ मध्ये तत्कालीन परराष्ट्र सचिन एम शाहिदुल हक यांनी सांगितलं होतं, की भारतानं घोषणा करण्याच्या काही तास आधी भूताननं बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतानं मोठं योगदान दिलं आहे. भारतानं सुरुवातीपासूनच बांगलादेशला हवी ती मदत दिली. आवामी लीग आणि शेख मुजीबुर रहमान यांना भारताकडून समर्थन देण्यात आलं. भारताच्या लष्करानं पूर्व पाकिस्तानच्या ऑपेरशनची जबाबदारी पूर्व कमांडकडे दिली होती.

Abdul AK Momen
बनावट नावानं 36 वर्षे काम करणारी व्यक्ती 31 डिसेंबरला होणार 'निवृत्त'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com