मल्ल्याविरोधातील पुरावे न्यायालयात दाखल 

पीटीआय
शनिवार, 28 एप्रिल 2018

सीबीआयने मोठे दस्तावेज येथील न्यायालयात सादर केले आहेत. यामध्ये मल्ल्या याने आयडीबीआय बॅंकेचे माजी उपव्यवस्थापकीय संचालक बी. के. बत्रा याच्यासोबत केलेल्या कटाचे पुरावे आहेत. 

लंडन : फरार उद्योगती विजय मल्ल्या याच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) येथील न्यायालयात सादर केलेले पुरावे दाखल करून घेण्यात आले आहेत. यामुळे मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला बळ मिळणार आहे. 

सीबीआयने मोठे दस्तावेज येथील न्यायालयात सादर केले आहेत. यामध्ये मल्ल्या याने आयडीबीआय बॅंकेचे माजी उपव्यवस्थापकीय संचालक बी. के. बत्रा याच्यासोबत केलेल्या कटाचे पुरावे आहेत. 

मल्ल्या याने बत्राच्या मदतीने अनेक बॅंकांकडून किंगफिशर एअरलाइन्सच्या नावावर कर्ज घेतले होते. न्यायालयाने हे पुरावे दाखल करून घेतल्याने मल्ल्याविरोधातील सीबीआयच्या तक्रारीला न्यायालयात बळ मिळाले आहे. न्यायालयाने मल्ल्याच्या प्रर्त्यापणास परवानगी दिल्यास ब्रिटनच्या गृहमंत्र्यांना या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी करण्यासाठी दोन महिन्यांच्या अवधी असेल. 

मल्ल्या आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलैला असून, तोपर्यंत 65 हजार पौंडच्या जातमुचलक्‍यावर मल्ल्याच्या जामिनाला मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुढील सुनावणीवेळी न्यायालय या प्रकरणाच्या निर्णयाबाबत सूतोवाच करण्याची शक्‍यता आहे. भारतीय बॅंकांचे 11 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून मल्ल्याने विदेशात पलायन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Mallya produce in court Britein