पाकमधील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट 

Violence against voting in Pakistan
Violence against voting in Pakistan

इस्लामाबाद : अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत पाकिस्तानात आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. क्वेट्टा शहरातील मतदान केंद्राजवळ आज झालेल्या आत्मघाती बॉंबस्फोटात 35 जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. "इसिस'ने या बॉंबस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

क्वेट्टा शहरातील मोठी गर्दी असलेल्या मतदान केंद्रामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न दुचाकीवरून आलेल्या एका आत्मघाती दहशतवाद्याने केल्यानंतर पोलिसांनी त्याला अडविले. त्या वेळी त्याने बॉंबस्फोट घडवून आणला. या बॉंबस्फोटात 35 जण मृत्युमुखी पडले असून, 35 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली. मतदानाच्या काळात पाकिस्तानात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असल्याचे सांगण्यात आले. 2013मध्ये झालेल्या मतदानापेक्षा पाच पटीने अधिक म्हणजेच तीन लाख 71 हजार लष्कराचे सैनिक या वेळी तैनात करण्यात आले होते. 

महिलांचा मोठा सहभाग 

अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमा भागात अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. कट्टरवाद्यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महिलांनीही मोठ्या प्रमाणात मतदानात भाग घेतला. 
पाकिस्तानातील मतदारांची संख्या 10.6 कोटी एवढी आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून, गुरुवारी पहाटेपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होतील, असे सांगण्यात आले. 

दुहेरी लढतीची शक्‍यता 

- लोकशाही मार्गाने सत्तेचे हस्तांतरण होण्याची पाकिस्तानच्या 70 वर्षांच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. 
- माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्यात दुहेरी लढत होण्याची अपेक्षा 
- या निवडणुकीत पाकिस्तानच्या लष्कराकडून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप 
- "इसिस'सारख्या दहशतवादी संघटनांनी निवडणूक प्रचाराच्या काळात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला 
- हिंसाचारात मोठ्या संख्येने नागरिकांचे बळी गेले 
- मतदानानंतर लगेचच मतमोजणी होणार असून, गुरुवारी सकाळी निकाल जाहीर होणार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com