Viral News: अबब! महिलेने एकाच वेळी दिला चक्क 9 मुलांना जन्म, पहिल्यांदाच सर्व बाळं सुखरुप

9 बाळांना जन्म देण्याचे प्रकरणे अनेकदा समोर आले आहेत. यालाच नोनूप्लेट्स असंही म्हणतात
Viral News
Viral Newssakal

सोशल मीडियावर आपण अनेक थक्क करणारे प्रकरणे आपण बघत असतो. एखादी आई एक पेक्षा जास्त दोन बाळांना म्हणजेच जुळवा बाळांना जन्म दिल्याचे आपण सर्वांनी ऐकले. पण तुम्ही नऊ बाळांना जन्म देणाऱ्या आईविषयी कधी ऐकलं का? हो, तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय.

एका महिलेनं 9 मुलांना जन्म दिला आहे. याआधीही असे 9 बाळांना जन्म देण्याचे प्रकरणे अनेकदा समोर आले आहेत. यालाच नोनूप्लेट्स असंही म्हणतात (Viral News Woman Gave Birth To 9 Babies are all safe)

माली या देशात 26 वर्षांची हलीमा सिसे नावाच्या महिलेने एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिला होता. हलिमाने 5 मे 2021 ला कॅसाब्लांका इथे 5 मुली आणि 4 मुलांना जन्म दिला होता. आता ही मुले आणि आई सुखरुप घरी पोहचली आहे.

याआधीही अशाच नऊ मुलांना जन्म देणाऱ्या घटनांमध्ये जन्माला आलेली मुलं वाचली नाही मात्र हलिमाच्या बाबतीत असे काही घडले नाही आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड ठरला.

Viral News
Biryani Types : सन्डे स्पेशल, पहा एकापेक्षा एक भारी बिर्याणीचे प्रकार

हलिमा 25 आठवड्यांची गरोदर होती तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे 30 आठवड्यांनंतर तिची सिझेरियन डिलेव्हरी करण्यात आली. तिच्या डिलेव्हरीच्या वेळी तब्बल 10 डॉक्टर अन् 25 पॅरामेडिक उपस्थित होते.

अर्थात नऊ मुलं झाल्याने त्यांचे वजन कमी आणि प्रतिकारशक्ती कमी होती. त्यामुळे त्यांना दक्षता कक्षात ठेवण्यात आलं आणि पहिल्यांदाच अशा प्रसूतीमधील मुलं सुखरुप आहे. त्यामुळेएकाच वेळी 9 मुलांना सुरक्षितरीत्या जन्म देण्याचा हा पहिलाच वर्ल्ड रेकॉर्ड म्हणावा.

Viral News
Viral News : काय नशीब म्हणावं, बोकड खाताही येईना अन् विकताही, वाचा प्रकरण

जगात अनेकदा नऊ मुलांना जन्म देण्याच्या अनेक घटना समोर आल्या. पण प्रत्येकवेळी आठवड्याभरातच ती लहान मुले दगावल्याचे समोर आले. मात्र हलिमाच्या बाबतीत असं काही न झाल्याने हा एक विश्वविक्रम ठरला.

सध्या सोशल मीडियावर हलिमाची विशेष चर्चा सुरू आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com