Scientific Fact: भविष्यात महामारीचं मोठं कारण ठरेल Climate Change! 'ही' आहेत कारणं

असे झाल्यास भविष्यात महामारी ही एखाद्या प्राण्यामुळे नाही वितळणाऱ्या बर्फामुळे येऊ शकते
Scientific Fact
Scientific Factesakal

Climate Change: ज्या वातावरणात आपण मोकळा श्वास घेतो त्याच वातावरणात अचानक बदल झालेत तर माणसाचं जीवन धोक्यात येऊ शकतं. अलीकडे वातावरणात होत चाललेल्या बदलांमुळे जगभरात बर्फ वितळण्याची गती आणखी जलद झाल्याचे दिसून येते. असे झाल्यास भविष्यात महामारी ही एखाद्या प्राण्यामुळे नाही वितळणाऱ्या बर्फामुळे येऊ शकते. हे कसं घडून येईल ते सविस्तर जाणून घेऊयात.

प्रोसीडिंग्स ऑफ द रॉयल सोसाइटी बी: बायोलॉजिकल साइंस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आलाय. क्लायमेट चेंजमुळे बर्फ वितळण्याचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. त्यामुळे बर्फाच्या पातळीत घट होऊन बर्फात असलेले वायरस आणि बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होऊ शकतात. (Environment)

जगात होऊ शकतो व्हायरल स्पिलओव्हर

व्हायरल स्पिलओव्हर ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये वायरसला एक नवा होस्ट मिळतो. हा होस्ट माणूस, प्राणी, रोपटे किंवा अन्य कुठलाही घटक असू शकतो. वायरस होस्टला संक्रमित करतो आणि नंतर ही महामारी पसरते. मातीच्या जेनेटिक अॅनालिसीसमधून हे निदर्शनास आलंय की बर्फ वितळल्याने नव्या व्हायरसच्या पसरण्याचा धोका वाढू शकतो.

आर्कटिक तलावात घेतले गेले सँपल

वायरस साधारत: जगभऱ्यातील प्रत्येक कोपऱ्यात आहे. शास्त्रज्ञांच्या टीमने आर्कटिक सर्कलमध्ये सगळ्यात मोठ्या हेजन तलावातील सँपल्स गोळा केलेत. कॅनडामध्ये हेजन हे फ्रेश वॉटर लेक आहे. यात मिळालेले वायरसमधील डिएनए बर्फात असलेल्या व्हायरसशी मॅच केल्या गेले. पुढे शास्त्रज्ञांनी सांगितले की, जसजसा बर्फ वितळेल तसतसे त्यातील व्हायरस बाहेर येतील. आणि लोकांना संक्रमित करतील.

Scientific Fact
Climate change : महाराष्ट्रातील या किनारपट्टीचा ५५ हेक्टर भाग पाण्याखाली

शास्रज्ञांनी हा प्रदेश निवडण्यामागे प्रमुख कारण म्हणजे आर्कटिक प्रदेशांमध्ये बर्फ वितळण्याचे प्रमाण इतर प्रदेशाच्या तुलनते जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com