
फ्लोरिडा (अमेरिका) : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात कार्यरत असलेली स्वयंसेवी संस्था ‘व्हिटॅमिन म’ गेली सात वर्षे अमेरिकेतील मराठी समुदायासाठी विविध उपक्रम राबवित आहे. कोविड काळात घरोघरी मोफत किराणा पोचवण्याचा उपक्रम असो की सुमारे ३०० रोपांची मोफत वाटप मोहीम, या संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. भारतीय आकाशवाणीनेदेखील या संस्थेच्या कार्याची दखल घेतली होती.