पुतिन यांचा वाढदिवस; रशियाने डागली जगातील सर्वात घातक क्रूज मिसाईल  

putin and russia
putin and russia

मॉस्को- रशियाने आपले सर्वात शक्तीशाली हायपरसोनिक क्रूज मिसाईल जिरकॉनचे यशस्वी परीक्षण घेतले आहे. रशियन सुरक्षा मंत्रालयाने सांगितले की, या मिसाईलचे परीक्षण बॅरेंट सागरात करण्यात आले आहे. मिसाईलने ध्वनीच्या वेगापेक्षा 8 पट वेगाने सागरातील एका खोट्या लक्ष्याला उद्धवस्त केले. विशेष म्हणजे आज (ता.7) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा वाढदिवस आहे.

पुतीन यांनी जिरकॉन मिसाईलच्या यशस्वी परीक्षणाचे कौतुक केले. रशियासाठी ही महत्वाची घटना आहे, यामुळे देशाच्या सुरक्षेत वाढ होईल, असं ते म्हणाले. पुतीन यांनी या योजनेत सामील असलेल्या सर्वांचे कौतुक केले. तसेच रशियाला अधिक ताकदवर बनवण्यासाठी त्यांनी असेच प्रयत्न करत रहावेत, असं ते म्हणाले आहेत. 

सुरक्षा मंत्रालयाच्या माहितीनुसार या मिसाईलची रेंज 450 किलोमीटरची आहे. मिसाईलने 28 किलोमीटर उंचीवरुन उडान घेतले आणि 4.5 मिनिटात 450 किलोमीटर अंतर पार करत लक्ष्याचा अचूक वेध घेतला. यादरम्यान मिसाईलने 8 मॅक इतकी गती गाठली होती. हाईपरसोनिक मिसाईलमध्ये जगभरात रशिया सगळ्यांपेक्षा पुढे आहे. रशियाने आपल्या 3m22 जिरकॉन मिसाईलला तैनात करणे सुरु केले आहे. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारताची ब्रह्मोस्त्र-2 मिसाईलही जिरकॉनवर आधारित आहे. साधारण मिसाईल बॅलेस्टिक स्वरुपाच्या असतात. बॅलेस्टिक मिसाईलचा मार्ग ट्रॅक केला जाऊ शकतो. त्यामुळे शत्रूला तयारी आणि पर्यायी हल्ला करण्याची संधी मिळते. दुसरीकडे, हायपरसोनिक वेपन सिस्टम निर्धारित मार्गावरुन मार्गक्रमन करत नाही. त्यामुळे शत्रूंना ही मिसाईल ट्रॅक करणे अशक्य होते. शिवाय याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 8 पटीने जास्त आहे. त्यामुळे या मिसाईल समोरएअर डिफेंस सिस्टिम निष्क्रिय ठरते. 

जीमेल येतंय नव्या रुपात; होणार महत्वपूर्ण बदल

जगातील  कोणत्याही देशाकडे  मिसाईल रोखण्याची क्षमता नाही

विशेष म्हजणे रशियाच्या अत्याधुनिक S-500 एअर डिफेंस सिस्टम सोडून जगातील इतर कोणत्याही देशाकडे हायपरसोनिक मिसाईल रोखण्याची क्षमता नाही. रशिया आणि चीनसोबत मुकाबला करता यावा, यासाठी अमेरिकाही या मिसाईलची निर्मिती करत आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, अमेरिका अविश्वसनिय असे लष्करी उपकरणे बनवत आहे. त्यांनी याला सुपर-डूपर असे नाव दिले आहे. 

(edited by- kartik pujari)


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com