Vladimir Putin Girlfriend | ७० व्या वर्षी पुतिन होणार बाप; गर्लफ्रेंड अलिना पुन्हा गरोदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vladimir Putin with his girlfriend
७० व्या वर्षी पुतिन होणार बाप; गर्लफ्रेंड अलिना पुन्हा गरोदर

७० व्या वर्षी पुतिन होणार बाप; गर्लफ्रेंड अलिना पुन्हा गरोदर

रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या ७५ दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. याचदरम्यान आज मॉस्कोमध्ये व्हिक्टरी परेड होत आहे. या सगळ्या धामधुमीतच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन पुन्हा एकदा बाप होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाईवा पुन्हा एकदा गरोदर आहे. त्यामुळे ७० व्या वर्षी पुतिन पुन्हा बाप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे .

रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांची ३८ वर्षीय कथित गर्लफ्रेंड अलिना कबाईवा(Alina Kabaeva, Girlfriend of Vladimir Putin) पुन्हा एकदा गरोदर आहे. आपली प्रेयसी गरोदर असल्याचं ऐकून पुतिन सध्या हैराण आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, व्हिक्टरी परेडची तयारी सुरू असतानाच पुतीन यांना गरोदरपणाबद्दलची माहिती मिळाली, त्यामुळे ते चांगलेच संतापले आहेत. कारण या गोष्टीसाठी पुतिन तयार नव्हते, त्यांनी कोणतंही नियोजन केलं नव्हतं.

हेही वाचा: पुतिन यांची 'मेहबुबा' संकटात; बेघर होण्याची वेळ येणार?

कोण आहे पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे अनेक वर्षांपासून ३८ वर्षीय जिम्नॅस्ट अलिना कबाईवा हिच्याशी संबंध आहेत.अलिनाने ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games) जिम्नॅस्टिक्स या खेळामध्ये दोन वेळा सुवर्णपदकही पटकावलं आहे. खेळातून निवृत्त झाल्यानंतर अलिना आता राजकारणात सहभागी झाली आहे आणि पुतिन यांच्या युनायटेड रशिया पार्टीची खासदार झाली आहे. व्लादिमिर पुतिन यांच्यापासून अलिनाला आधीच दोन मुलेही आहे. मात्र पुतिन यांनी अलिनासोबतचं आपलं नातं कधीही स्विकारलेलं नाही.

Web Title: Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva Is Pregnant Again

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Vladimir PutinRussia
go to top