Russian President Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबाबत एक आश्चर्यकारक आणि विचित्र माहिती समोर आली आहे. परदेश दौऱ्यांवर जाताना पुतीन स्वतःचे पोर्टेबल टॉयलेट सोबत नेत असल्याचा दावा केला जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही असामान्य खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आहे. या दाव्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे पुतीन सध्या भारत दौऱ्यावर आहेत.