Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

vladimir putin takes oath ब्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली आहे.
Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

ब्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली आहे. क्रेमलिनमध्ये एखा भव्य कार्यक्रमात ७१ वर्षीय पुतिन यांनी आपल्या पाचव्या कार्यकाळाची सुरूवात केली. विरोधकांना चिरडल्याचे आरोप केले जात असतानाच पुतिन पुन्हा सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत. सध्या रशियावर सर्व बाजूने संकटे कोसळत असून रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुतिन सत्तेत आणखी मजबूत होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक आव्हानांचा त्यांना सामना करावा लागत आहे. विशेषतः युक्रेनसोबत सुरू असलेलं युद्ध पुतिन यांच्यासाठी आव्हानात्मक ठरले आहे.

पुतिन यांचे प्रमुख विरोधक एलेक्सी नवलनी यांचा गुढ परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर मार्च मध्ये झालेल्या या निवडणूका फक्त दिखावा असल्याचे पाश्चिमात्य देशांनी म्हटले होते. रशियामध्ये पुतिन यांचे विरोधक एकतर जेलमध्ये आहेत किंवा देश सोडून पळून गेले आहेत. २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पुतिन यांची सत्तेवरील पकड आणखी घट्ट झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र युक्रेनसोबतच्या युद्धानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. अर्थव्यवस्था जागेवर आणण्यासाठी पुतिन यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने
Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

पुतिन यांनी १९९१ मध्ये सेंट पीटर्सबर्गचे महापौर म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी गुप्तचर अधिकारी म्हणूनही काम केले आहे. १९९८ मध्ये, तत्कालीन अध्यक्ष बोरिस येल्तसिन यांनी त्यांना FSB सुरक्षा सेवेचे प्रमुख आणि पुढच्या वर्षी पंतप्रधान म्हणून नियुक्त केले.

येल्तसिन यांच्या राजीनाम्यानंतर पुतिन कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष झाले आणि नंतर हळूहळू रशियातील सत्ता त्यांच्या ताब्यात आली. सध्या पुतिन यांच्यापुढे युक्रेनमध्ये विजय मिळवणे हे मोठे आव्हान आहे कारण अमेरिका आणि पाश्चात्य देश उघडपणे युक्रेनच्या पाठीशी उभे आहेत. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत पुतिन यांनी दणदणीत विजय मिळवला होता. दोन दशकांहून अधिक काळ रशियात त्यांची सत्ता आहे. ऑगस्ट १९९९ मध्ये त्यांची राष्ट्रपतीरजी नियुक्ती झाली. डिसेंबर १९९९ मध्ये ते कार्यवाहक राष्ट्रपती झाले. पुतिन यांनी २००० मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते २००४, २०१२ आणि २०१८ मध्येही राष्ट्रपती झाले आहेत. आता पाचव्यांदा त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले आहे.

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने
बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com