कोरोना लशीच्या एका बातमीने अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये खळबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 9 November 2020

फायझर Pfizer कंपनीच्या कोरोना लशीच्या बातमीने अमेरिकेच्या स्टॉक मार्केटने मोठी उसळी घेतल्याचे दिसले.

वॉशिंग्टन- फायझर Pfizer कंपनीच्या कोरोना लशीच्या बातमीने अमेरिकेच्या स्टॉक मार्केटने मोठी उसळी घेतल्याचे दिसले. फायझरची कोरोना लस 90 प्रभावी असल्याचे कंपनीने जाहीर केली आहे. त्यामुळे लवकरच लस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. 

यूएस स्टॉक मार्केटमध्ये सकाळी मोठी उसळी पाहायला मिळाली. बेलवेदर डॉ जॉन्स इंडस्ट्रिमध्ये bellwether Dow Jones Industrial च्या शेअर्समध्ये सरासरीमध्ये 4.4 टक्क्यांनी वाढ होत, 29,553.62 पॉईंट्स पर्यंत गेला. tech-heavy Nasdaq च्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. 

कोरोना महामारीमुळे लाखो लोकांना आपल्या घरामध्ये बंदिस्त राहावे लागले. आता कोरोना लशीच्या बातमीने लोकांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचेच पडसाद अमेरिकेच्या स्टॉकमध्ये दिसले. ट्रॅव्हल आणि फार्मा कंपन्यांचे शेअर्स मजबूत झालेत, तर लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरले गेलेल्या झूम कपनीच्या शेअर्मध्ये 15.5 टक्क्यांची घट झाल्याचे पाहायला मिळाले. 

आनंदाची बातमी! Pfizer आणि BioNTech च्या कोरोना लशीचे रिझल्ट हाती

अमेरिकीच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांचा विजय झाल्यानंतरही स्टॉक मार्केटमध्ये हालचाल पाहायला मिळाली होती. आता कोरोना लशीच्या बातमीने लोकांना उत्साहित केले आहे. जीवन आता पुन्हा पू्र्वपदावर येईल, असं लोकांना वाटू लागलं आहे. फायझरच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची वाढ झाली आहे.

दरम्यान, कोरोना लशीची निर्मिती करणाऱ्या फायझर (Pfizer) आणि BioNTech कंपन्यांनी आनंदाची बातमी दिली आहे. लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमधून चांगले परिणाम दिसून आल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोविड लस 2020 च्या शेवटापर्यंत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फायझरचे अध्यक्ष आणि सीईओ अल्बर्ट बोरला यांनी म्हटलं की, आमच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकाल हाती आले आहेत. यातून लस 90 प्रभावी असल्याचे स्पष्ट होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wall Street breaks records on Covid vaccine news