esakal | युद्धग्रस्त! अफगाणिस्तान पाकची वसाहतच
sakal

बोलून बातमी शोधा

afganisthan

युद्धग्रस्त! अफगाणिस्तान पाकची वसाहतच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लंडन: युद्धग्रस्त अफगाणिस्तान ही वस्तुतः पाकिस्तानची वसाहतच आहे. एक वसाहतवादी महासत्ता म्हणून इस्लामाबादकडे या देशाची सूत्रे आहेत. तालिबानचे सूक्ष्म व्यवस्थापन ‘आयएसआय’ ही पाकची कुख्यात गुप्तचर संस्था करते, असे परखड प्रतिपादन अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अम्रुल्लाह सालेह यांनी केले.

हेही वाचा: 'त्या' घटनेनंतर ५ लाख शिखांनी अफगाणिस्तान सोडले होते...

‘डेली मेल’ या ब्रिटनमधील वृत्तपत्रात सालेह यांनी एक लेख लिहिला आहे. अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून त्यांनी स्वतःचे नाव जाहीर केले आहे. पंजशीर खोऱ्यातून तालिबानच्या विरोधातील लढ्याचे नेतृत्व ते करीत आहेत.

पाकचे कडवे टीकाकार अशी सालेह यांची ओळख आहे. इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात ‘आयएसआय’बद्दल त्यांनी ठामपणे सांगितले की, अक्षरशः दर तासाला पाक वकिलातीच्या मार्फत तालिबानच्या प्रवक्त्याला सूचना दिल्या जातात. पाकचे वर्चस्व फार काळ टिकणार नाही. त्यांचे या प्रांतावर नियंत्रण आहे, मात्र भूभाग नियंत्रणात आणला म्हणजे तेथील जनता किंवा स्थैर्यावर ताबा मिळाला असे नाही हे इतिहास सांगतो.

हेही वाचा: ISI चे चीफ फैझ हमीद काबुलमध्ये दाखल, पडद्यामागे काय घडणार?

पाकमधील निर्वाचित सरकार उलथविण्यात आणि तालिबानकडे सूत्रे देण्यात पाकिस्तानचा निर्णायक हात असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका पाहणी अहवालात अल कायदाचे महत्त्वाचे नेते अफगाण-पाक सीमावर्ती भागांत राहतात आणि तेथून सूत्रे हलवितात असे नमूद करण्यात आले होते.

सालेह यांचे मुद्दे

तालिबानने सत्ता मिळविली असली तरी त्यांनी देशवासीयांचे हृदय आणि मने जिंकलेले नाही.

दमछाक झालेल्या अमेरिकी अध्यक्षांच्या सदोष धोरणाचा गैरफायदा तालिबानने उठविला.

सदोष धोरणास केवळ अमेरिकाच जबाबदार आहे असे नाही.

पाश्चात्त्यांनी अफगाणिस्तानचा मोठा विश्वासघात केला आहे, आमच्या घटनेच्या आड येणार नाही असे आश्वासन पाश्चात्त्य नेते वीस वर्षे देत होते.

पाश्चात्त्यांनी तालिबानसमवेत राजकीय तोडगा काढावा, ज्यास अफगाण जनता आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा असेल

राजकीय तोडगा काढणे ही पाश्चात्त्यांची नैतिक जबाबदारीच.

पाश्चात्त्यांकडे मला वाचवा अशी माझी याचना नाही.

पाश्चात्त्यांनीच त्यांची लाज राखण्यासाठी, त्यांची प्रतिष्ठा सावरण्यासाठीस, लौकिक आणि विश्वासार्हता वाचविण्यासाठी हे करावे

पाश्चात्त्यांनी आम्हाला केवळ नैतिक आणि शक्य असेल तेव्हा वस्तूंच्या रूपाने पाठिंबा द्यावा.

पंजशीरमध्ये एकत्र आलेल्या आम्हा लढवय्यांच्या ह्रदयात घटनेचे तत्त्व साठले असून घटनेतील वचनांचे जतन करण्यासाठी आमचा लढा सुरू.

loading image
go to top