Donald Trump : कॅपिटॉल हल्ला प्रकरण; ट्रम्प यांच्यावर निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचे आरोप निश्‍चित

अमेरिकी अध्यक्षपदासाठी २०२० मध्ये झालेल्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत.
Donald Trump
Donald TrumpSakal

वॉशिंग्टन - अमेरिकी अध्यक्षपदासाठी २०२० मध्ये झालेल्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. अध्यक्षपदाची आगामी निवडणूक लढविण्याची तयारी करत असलेल्या ट्रम्प यांच्याविरोधात दाखल झालेला हा तिसरा फौजदारी गुन्हा ठरला आहे.

अमेरिकेत २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत मतमोजणीनंतर तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव स्पष्ट झाल्यानंतरही त्यांनी हा पराभव स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांनी अनेक आधारहिन दावे करत समर्थकांना चिथावणी दिली होती.

सहा जानेवारी २०२१ रोजी कॅपिटॉल इमारतीत विजयी उमेदवारांनी दिलेल्या मतांची मोजणी सुरु असताना ट्रम्प यांच्या समर्थकांनी या इमारतीवर हल्ला करत गोंधळ घातला होता.

या गोंधळामागे ट्रम्प यांनी दिलेली चिथावणीच कारणीभूत असल्याचा आरोप होत या प्रकरणी तपास सुरु झाला होता.

अन्य सहा जणांवरही आरोप

कॅपिटॉल हल्लाप्रकरणात आणखी सहा जणांचाही समावेश असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या सहा जणांची नावे आरोपपत्रात नसली तरी ट्रम्प यांना विधी सल्ला देणाऱ्या पथकातील रुडी ज्युलियानी यांचा त्यात समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांना उद्या (ता. ३) येथील न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तपास व चौकशी पूर्ण

आरोपपत्रात डोनाल्ड ट्रम्प यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे मान्य करण्यात आले असले तरी, त्यांनी या अधिकाराचा गैरवापर करत मतमोजणीत आणि निकालात बेकायदा पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न केला, असे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. आरोपनिश्‍चित केल्याने ट्रम्प यांच्याविरोधातील गुन्ह्याचे स्वरुप स्पष्ट झाले आहे. तसेच तपास व चौकशीही पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले.

आरोपपत्रातील मुद्दे

  • पराभव झाल्यानंतरही सत्तेत टिकून राहण्यासाठी ट्रम्प यांनी अनेक अफवा पसरविल्या.

  • मतमोजणीत भ्रष्टाचार झाला असून प्रत्यक्षात आपलाच विजय झाला असल्याचे सांगत समर्थकांनी चिथावणी दिली.

  • आपले दावे चुकीचे असल्याचे माहित असूनही ट्रम्प यांनी ते वारंवार केले.

  • कॅपिटॉलवरील हल्ला म्हणजे देशाच्या लोकशाहीवर हल्ला

  • ट्रम्प यांच्या चुकीच्या वक्तव्यांमुळे प्रक्रियेत अडथळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com