अमेरिका भारताला मालवाहू सी-17 विमान विकणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

वॉशिंग्टन: ट्रम्प प्रशासनाने भारताला सी-17 मालवाहू विमान विकण्याचा निर्णय घेतल्याने भारताच्या सध्याच्या आणि भविष्यातील हवाई दलाच्या वाहतूक क्षमतेत वाढ होईल, अशी आशा पेंटागॉनने केली आहे.

बोइंग कंपनीच्या सी-17 मालवाहू विमानाची अंदाजित रक्कम 36.62 कोटी डॉलर आहे. त्यात क्षेपणास्त्र सूचना यंत्रणा, काऊंटर मेजर डिस्पेसिंग सिस्टिम, आयडेंटिफिकेशन फ्रेंड किंवा फोई (आयएफएफ) ट्रान्सपॉंडर तसेच दिशादर्शक उपकरणाचा समावेश आहे.

सुरक्षा संरक्षण सहकार्य एजन्सीने सोमवारी कॉंग्रेसला पाठवलेल्या अधिसूचनेत म्हटले की, प्रस्तावित विक्रीमुळे भारताची सद्यःस्थिती आणि भविष्यात हवाई दलाच्या परिवहनाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. नैसर्गिक आपत्तीचा विचार करता भारत संवेदनशील भागात आहे. हवाई वाहतुकीच्या अतिरिक्त क्षमतेचा वापर हा संकटकाळात आणि आपत्कालीन काळात करता येणार आहे. याशिवाय सी-17 च्या खरेदीमुळे भारताला हवाईदलाची आणि लढाऊ हवाई परिवहन क्षमतेत वाढ करू शकतो. सध्या भारत सी-17 विमानाचा वापर करत असून आपल्या लष्करात या विमानांना सहभागी करून घेताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

सी-17 विमानाची उपयुक्तता
सी-17 विमानाची कमी लांबीच्या धावपट्टीवर उतरण्याची क्षमता असून एअर लिफ्ट आणि एअर ड्रॉप या अभियानात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावू शकतो. याशिवाय सामानाची आणि रुग्णांची ने-आण करू शकतो. सी-17 विमान हे 1,70,900 पौंडाचे वजनी सामान (जवान आणि उपकरणासह) ने- आण करू शकतो.

Web Title: washington news donald trump government sell c-17 aircraft to india