अमेरिकेचे लष्कर सज्ज असल्याचा उत्तर कोरियाला इशारा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर

वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज असल्याचा इशारा आज अमेरिकेकडून उत्तर कोरियाला देण्यात आला. उत्तर कोरियाने जर अमेरिका किंवा मित्रदेशांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची हिंमत केली तर त्यास त्वरित कठोर प्रत्युत्तर देण्यात येईल, असा सज्जड दम अमेरिकेकडून देण्यात आला आहे.

उत्तर कोरियाकडून जर कुठली आगळीक करण्यात आली, तर तो देश कल्पानाही करू शकणार नाही, अशा प्रकारची कारवाई केली जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आज पुन्हा उत्तर कोरियाला स्पष्ट शब्दांत धमकावले आहे.

एका संयुक्त पत्रकार परिषदेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन यांनी याबाबतची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस, जपानचे परराष्ट्रमंत्री टारो कोनो आणि जपानचे संरक्षणमंत्री इत्सुनोरी ओनोडेरा आदी उपस्थित होते.

टिलरसन म्हणाले, की उत्तर कोरियाच्या कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. लष्करी बळाचा वापर करण्यास अमेरिकेचे प्राधान्य असणार नाही, हे सर्वांनी समजून घ्यावे. मात्र, कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अमेरिकेसह आमची मित्रराष्ट्रे सुसज्ज आहेत.

जपान, ग्वाम, अमेरिका किंवा दक्षिण कोरियाच्या हद्दीत उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्वरित ठोस कारवाई करण्यात येईल, असे मॅटीस म्हणाले

Web Title: washington news usa army and north korea