अमेरिकी युद्धनौकेची मालवाहू जहाजाला धडक

वृत्तसंस्था
रविवार, 18 जून 2017

टोकियोच्या खाडीत अपघात, सात खलाशी बेपत्ता, तीन जखमी

टोकियो / वॉशिंग्टन: अमेरिकी नौदलाची एक विनाशिका आणि फिलिपिन्सच्या मालवाहू जहाजाची धडक झाली. या अपघातानंतर अमेरिकी नौदलाचे सात कर्मचारी बेपत्ता आहेत, तर तीन जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले. जपानमधील टोकियोच्या खाडीत हा अपघात झाल्याचे अमेरिकी नौदलातर्फे स्पष्ट करण्यात आले.

या दुर्घटनेनंतर अमेरिकी नौदलाच्या विनाशिकेला जलसमाधी मिळण्याची शक्‍यता निर्माण झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी जपानच्या तटरक्षक दलाने ही शक्‍यता फेटाळून लावली आहे. अपघातग्रस्त युद्धनौकेत काही प्रमाणात पाणी शिरले असले तरी ती बुडण्याच्या स्थितीत नाही, असे जपानचे म्हणणे आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात जहाजांची ये- जा असलेल्या टोकियोच्या खाडीत हा अपघात झाला.

"यूएसएस फित्झजेराल्ड' असे अपघातग्रस्त झालेल्या अमेरिकेच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचे नाव आहे. जपानमधील योकोसुकापासून 56 सागरी मैल अंतरावर युद्धनौका आणि मालवाहू जहाजाची धडक झाल्याची माहिती अमेरिकी नौदलातर्फे देण्यात आली. युद्धनौकेवरील तीन जणांना वाचविण्यात आले असून, त्या सर्वांना उपचारांसाठी योकोसुका येथील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात युद्धनौकेचा कॅप्टन कमांडर ब्रिस बेन्सन यांचाही समावेश आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. अमेरिकी युद्धनौकेचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: washington news usa cargo-ship accident