esakal | पाकिस्तानवर विश्वास नव्हता, म्हणून लादेनचा ठावठिकाणा लपवून ठेवला- अमेरिका
sakal

बोलून बातमी शोधा

osama.jpg

अबोटाबादेत लादेनचे वास्तव्य आहे ही बाब पाकिस्तान सरकारमधील कोणत्याच नेत्याला ठावूक नव्हती असे असणे कदापि शक्य नव्हते

पाकिस्तानवर विश्वास नव्हता, म्हणून लादेनचा ठावठिकाणा लपवून ठेवला- अमेरिका

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- पाकिस्तानवर विश्‍वास नसल्याने आम्ही कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा ठावठिकाणा पाकिस्तानपासून लपवून ठेवला होता, कारण या आधी आम्ही अशी माहिती त्यांना दिली तेव्हा ती त्यांनी दहशतवाद्यांपर्यंत पोचविली होती, असे प्रतिपादन अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री आणि गुप्तचरसंस्था सीआयएचे प्रमुख लिओन पॅनेट्टा यांनी केले आहे. एका अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे.

अबोटाबादेत लादेनचे वास्तव्य आहे ही बाब पाकिस्तान सरकारमधील कोणत्याच नेत्याला ठावूक नव्हती असे असणे कदापि शक्य नव्हते, असेही त्यांनी नमूद केले. अल-कायदाचा म्होरक्या असणारा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या सील कमांडो पथकाने अबोटाबादेत २ मे २०११ रोजी ठार मारले होते. अबोटाबाद हे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या कारवायांचे देखील केंद्र होते. या पाकिस्तानचा पश्‍चिम भाग होय. अमेरिकेची लष्करी अकादमी देखील न्यूयॉर्कमध्ये पश्चिमेलाच आहे. ज्या भागामध्ये लादेनचे वास्तव्य होते तेथील इमारतीची उभारणी एखाद्या मजबूत किल्ल्यासारखी करण्यात आली होती, तिच्या एका बाजूला १८ आणि दुसऱ्या बाजूला १२ फूट उंचीची भिंत उभारण्यात आली होती, असेही पॅनेट्टा यांनी नमूद केले.

कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी केरळने घेतला मोठा निर्णय

ओबामाशींही चर्चा

अबोटाबादेतील लादेनचा ठावठिकाणा शोधून काढल्यानंतर याची पूर्वकल्पना पाकिस्तानला द्यायची की नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर बरीच चर्चा झाली होती. खुद्द अध्यक्ष बराक ओबामा यांचेही यावर मत जाणून घेण्यात आले होते, पण शेवटी ही माहिती गोपनीयच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असे त्यांनी स्पष्ट केले.